Land record rules 2024 जेव्हा आपण शेती जमीन खरेदी करत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टीं ची माहिती आपल्याला घ्यावी लागते आणि जमीन खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते बराच वेळा जमिनी खरेदी करत असताना अडचणी येत असतात आणि या अडचणीमुळे बराच वेळा व्यवहार रद्द होतात किंवा व्यवहार सुरळीत होत नाहीत त्यामुळे व्यवहार करत असताना आपल्याला जमिनी बद्दलचे सर्व माहिती असणे गरजेचे आहे चला पाहूया त्याबद्दलची संपूर्ण माहिती
जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा बघणे :
जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा तपासणी गरजेचे आहे सातबारावर जमिनीची मालकी कोणाच्या नावावर आहे क्षेत्रफळ किती आहे शेत जमिनीची सीमा किती आहे याची माहिती सर्व सातबारावर आणि फेरफार यावर उपलब्ध असते याबद्दलची माहिती तुम्ही ऑनलाईन हे देखील घेऊ शकता
सातबारा वरील नावे विक्रेत्याचीच आहेत का? किती वर्षापासून ही नावे आहेत सातबारावर कोणाकोणाची नावे आहेत याबाबतची माहिती आपल्याला सातबारा मिळते त्याचबरोबर यापूर्वी कोणत्या मालकाकडून ही जमीन घेतलेली आहे किंवा सध्या मालक कोण आहेत आणि या जागेवर कोणते कर्ज घेतलेले आहे किंवा कोणता बोजा आहे का ? याबाबतची सर्व माहिती मिळते
Land record rules 2024 जमिनीचा नकाशा पाहणे :
जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा गट नंबर तपासून किती जागा आहे याची माहिती करणे गरजेचे आहे त्याचबरोबर सातबारावर जो नकाशा दिलेला आहे त्या पद्धतीने जमीन आहे का आणि त्या जमिनीचा तेवढे भरते का याबद्दलची माहिती ही आपल्याला समजली पाहिजे जमिनीला जायला रस्ता आहे का रस्ता असेल तर त्या रस्त्यामध्ये वाद आहेत का याबाबतची माहिती ही असणे गरजेचे आहे
सरकारी मोजणी करणे :
शेतजमीन खरेदी करत असताना शेत जमिनीची सरकारी मोजणी केलेली आहे का यामधून सरकारी मोजणीमधून किती जागा भरते आणि किती रस्त्याला जाते याबाबतची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे त्याचबरोबर लागलेले बांध दुसऱ्या मालकाचे मूळ मालकाचे कसे वाटणे आहे याबाबतची ही माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे जमिनीची मोजणी करत असताना सर्व माहिती घेऊन मोजणी करून घ्यायची आहे
शेत रस्ता तपासणे :
जर तुम्ही बिगर शेती जमीन खरेदी करत असाल ज्या ठिकाणी माळ आहे किंवा त्या जागेला रस्ता नकाशामध्ये दाखवलेला नाही किंवा त्या जमिनीला खाजगी रस्ता आहे तर त्या रस्त्यासाठी दाखवलेल्या जमिनीच्या संबंधित मालकाचे न हरकत पत्र असणे गरजेचे आहे आणि त्यामधून शेत जमिनीला रस्ता करून देण्याचे काम जर मूळ मालक करत असेल तर त्याच्याकडून याबाबतचे पत्र घ्यायचे आहे
✅🍀“भाजीपाला विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला माहिती आहे का? 1 लाख पर्यंत कर्ज”⏪
खरेदीखत करणे :
वरील सर्व बाबी तपासल्यानंतर तुम्हाला तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहेत आणि त्यानुसार आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावी लागणार आहे खरेदी झाल्यानंतर सर्व मालकी हक्क मिळोपर्यंत कालावधी जातो त्या कालावधीमध्ये सर्व माहिती योग्य आहे का आणि यामध्ये कोणताही बदल केलेला नाही याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी तुम्हाला शेतजमीन खरेदी करत असताना माहिती असणे गरजेचे आहे यामुळे बऱ्याच गोष्टी वाचतात त्याचबरोबर खर्चही कमी येतो आणि माहिती असलेल्या माहितीमुळे खरेदी करत असताना कोणत्या अडचणी येत नाहीत.