Increse in wheat price 2023 सध्या देशामध्ये गव्हाचे उत्पन्न वाढलेले आहे आणि अशा मधील भारतातील गव्हाचे उत्पन्न जगातील तुलनेपेक्षा जास्त झालेले आहे यंदा गावाची किमती सरासरी पेक्षा जास्त आहेत आणि अशा मध्ये जाता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यंदा गावाचे उत्पन्न वाढले असल्यामुळे देशातील गव्हाची मागणी वाढलेली आहे आणि अशा मध्ये जाता असे निर्णय घेऊन केंद्र सरकार देशातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत आहे पण एकीकडे शेतकऱ्यांना घवाला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Increse in wheat price 2023 महागाई नियंत्रणासाठी घेतला निर्णय :
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर देशामध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे अशा मध्ये सर्वसामान्य जनतेला कमी दारात स्वस्त वस्तू मेळाव्यात आणि सर्वांना खाद्यसामग्रीचे योग्य दर मिळावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे सरकार गहू आणि तांदळाच्या साठ्यावर लक्ष देऊन आहे गावाची साठवणूक करू नये साठवणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती सरकारने देणे बंधनकारक असल्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे
गव्हाच्या किमती वाढू नयेत म्हणून सरकारने गहू साठा मर्यादित लावली होती साठा मर्यादीची मुदत 31 मार्चला संपत आहे यामुळे गावाचा साठा करून दर वाढण्याची शक्यता आहे यामुळेच सरकारने साठा जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे गव्हाच्या किमती नियंत्रित राखण्यासाठी असे निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
✳️⏩🍃शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुलै सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस; अपेक चा हवामान अंदाज⏪
पण शेतकऱ्याचे काय :
एकीकडे देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी कार्य करत आहे पण शेतकऱ्यांसाठी काय ? असा प्रश्न उभा राहत आहे शेतकरी जीव तोडून मेहनत करतो आणि शेतकऱ्यांना कवडीचा भाव मिळतो यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेती माल कुठे विकायचा आणि किती दराने विकायचा असा शेतकऱ्यांपाशी प्रश्न उभारलेला आहे पण केंद्र सरकारने यावर निर्णय घ्यावेत आणि शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.