Borewell Scheme 2024महाराष्ट्र मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल साठी अनुदान मिळवू शकतात. राज्यामध्ये सध्या परिस्थिती पाहता बरेच जण शेतकरी बोर करण्याचे नियोजनात असतात. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना बोर काढल्याशिवाय पर्याय नसतो पाणी उपलब्ध असल्याशिवाय शेतीला काहीच उपयोग नसतो त्यामुळे बोर काढणे हे काळाची गरज झालेली आहे. राज्यातील बारा शेतकऱ्यांना अजून पर्यंत बोर काढण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी बोरवेल काढू शकत नाहीत त्यामुळे राज्य सरकार यासाठी अनुदान देत आहे पाहुयात कसे?
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना बोर काढण्यासाठी लागणारे खर्च जमत नाही त्यामुळे बरेच शेतकरी बोर काढण्यास नाकारतात त्यामुळे त्यांना पाण्याची उपलब्धता दुसऱ्या शेतकऱ्याकडून किंवा एखाद्या वेरी कडून किंवा नदीमधून उपलब्ध करावे लागते अशाच आता राज्य सरकारने या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता मिळवून देण्यासाठी. बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत बोरवेल काढण्यासाठी अनुदान देत आहेत
Borewell Scheme 2024 योजनेची पात्रता :
लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे
लाभार्थीची जातीचा वैद्य दाखला असणे बंधनकारक आहे
लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपयांच्या आत असावी
लाभार्थ्याची जमीन कमीत कमी अर्धा एकर ते साहेब पर्यंत असणे बंधनकारक आहे
एकदा या योजनेचा लाभ घेतला पुन्हा शेतकऱ्याला लाभ घेता येत नाही
आवश्यक कागदपत्रे :
जातीचा दाखला
सातबारा आठ अ उतारा
उत्पन्नाचा दाखला
लाभार्थ्याची प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर
अपंग असल्यास प्रमाणपत्र
जमीन समाईक असल्यास त्याचा दाखला
भूजल सर्वेक्षण दाखला
कृषी अधिकारी शिफारस पत्र
गटविकास अधिकारी शिफारस पत्र
ज्या जागी बोरवेल घ्यायचा आहे त्याचा फोटो
⚡🍃शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत होणार फायदा🔰
अर्ज कसा करावा :
या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभार्थी असाल तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटला जाऊन लॉगिन करून तिथे बिरसा मुंडा योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत.
महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी : येथे क्लिक करा