Ban on Onion export 2024 सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील बारा शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली सध्याही कांदा निर्यात बंदी सुरू आहे आणि कांदा निर्यात बंदीचा निर्णय 31 मार्चनंतर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि याचे कारण काय आहे आणि यामुळे परिणाम काय होतील याबद्दल आपण पाहणार आहोत
यावर्षी देशातील कांदा उत्पादन वाढलेले आहे आणि अशा मध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण पादण्यात येत आहे मागील आठवड्यामध्ये कांद्याला जो दर होता तो आता पूर्णपणे खाली आलेला आहे कांद्याच्या दरामध्ये पुढील आठवड्यामध्ये सुधारणा होण्याचे काही संकेत आहेत पण कांद्याला चांगले दिवस येतील असे सध्या तरी काय वाटत नाही. केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी ठेवली होती पण ती निर्यात बंदी आता पुढे ढकलली आहे आणि कांदा निर्यात बंदी अजून काढलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पाहण्यात येत आहे.
Ban on Onion export 2024 ठराविक देशांना निर्यात :
केंद्र सरकारने जरी कांद्याचे निर्यातीवर बंदी घातली असली तरी भारत देशावर जे देश कांद्याच्या निर्यातीसाठी अवलंबून आहेत अशा देशांना भारताकडून कांदा पाठवण्यात येणार आहे. सध्या भूतानला 550 मॅट्रिक टन बांगलादेश ला 50000 मॅट्रिक टन बेहरीन 3000 मेट्रिक टन मॉरिशियसला 1200 मॅट्रिक टन कांदा हा निर्यात होणार आहे त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्याकडून पाच लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे आणि त्याची निर्यात करणार आहे.
निर्यात बंदी का पुढे ढकल्ली ?
सध्या भारतामधील परिस्थिती पाहता भारतातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टी जनक पाऊस पडत आहे तर काही राज्यांमध्ये दुष्काळ जनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा मध्येच या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केव्हा लोकांना सर्व भाजीपाला व वस्तूंचे दर नियंत्रण राहण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे असे समजते. सध्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला स्वस्त कांदा त्याचबरोबर इतर सामग्री स्वस्त दरात उपलब्ध करून देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम सरकार करत आहे.
🍃शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत होणार फायदा🔰
सरकार खरेदी करणार 5 लाख मेट्रिक टन कांदा :
सध्या 31 मार्चपर्यंत जी निर्यात बंदी केंद्र सरकारने लावलेले होती ती आता पुढे त करण्यात आलेली आहे अशा मध्ये इतर देशातील भारतीय कांद्याची मागणी पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्यास असल्याचे सांगितले आहे यामध्ये भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार आहे याची नोंदणी केली जाणार आहे.