Pashupalan yojana 2024 राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी विविध योजना सध्या उपलब्ध आहेत पशुपालन हा एक प्रामुख्याने महत्त्वाचा उत्पन्न स्त्रोत मानला जातो आणि शेतकऱ्यांना शेतीबरोबर पशुपालन करणे सध्या काळाची गरज ठरलेली आहे पशुपालन व्यवसायामध्ये बरेच शेतकरी आता लाखो मध्ये कमावत आहेत आणि गरीब आणि छोट्या कुटुंबांना पशुपालन करणे आता सोपे झालेले आहे या योजनांचा फायदा शेतकरी घेऊ शकतात आणि या योजना मधून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अनुदान मिळते यासाठी अर्ज कसा करावा पात्रता काय आहे आणि किती शेतकऱ्यांना कसे अनुदान मिळते याबाबत आपण पाहूयात
राजकीय शेतकऱ्यांना प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांना आणि पुरुष शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे शेतीपूरक व्यवसायासाठी अनुदान राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकार देत असते. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला पाहिले जाते आणि रोजगार निर्मिती संकल्पना राबवत असताना पशु संवर्धन आणि दूध व्यवसाय विभागाने त्याच्या आधारित विविध पशुपालनाच्या योजनांमध्ये महिलांसाठी 30 टक्के प्राधान्य दिलेली आहे
Pashupalan yojana 2024 पशुपालन योजना :
शेळी पालन व्यवसाय योजना
दुधाळ जनावरे गटवाटप योजना
कुक्कुटपालन योजना
या तीन योजनेमधून शेतकरी किंवा महिला शेतकरी सदाचा पशुपालन व्यवसाय सुरू करू शकतात आणि यामधून उत्पन्न मिळवू शकतात
शेळीपालन योजना :
यामध्ये शेतकऱ्यांना त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांना प्रकल्प गटाच्या 50% तर अनुसूचित जाती आणि जामतेच्या लाभार्थी शेतकरी वर्गाला 75 टक्के अनुदान मिळते व खुल्या घाटातील लाभार्थी उर्वरित 50 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 25% रक्कम किंवा बँकेकडून कर्ज स्वरूपात रक्कम मिळते यामधून शेतकरी शेळीपालनासाठी अर्ज करू शकतात आणि यासाठी जवळच्या पंचायत समिती आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडे चौकशी करून यासाठी शेतकरी अर्ज करू शकतो. यामध्ये शेतकऱ्यांना दोन एक बोकड असे मिळते याअंतर्गत मागील डिसेंबर महिन्यामध्ये योजना सुरू होती सध्या या योजनेचे अर्ज सुरू झाल्यानंतर माहिती दिली जाईल.
दुधाळ जनावरे गट वाटप योजना :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुधाळ जनावर पालनासाठी एक गाडी दोन म्हशी असे वाटप केले जात आहे सध्या योजनेचे पार्श्वभूमी पाहता या योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात यामध्ये खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना प्रकल्प गटाच्या 50% अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थी वर्गाला 75 टक्के अनुदान मिळते यासोबतच गाई म्हशी गोठ्यासाठी ही अनुदान मिळते.
कुकुट पालन व्यवसाय अनुदान :
1000 पक्षी कोंबड्यांचे संगोपन करून व्यवसाय सुरू करण्यासाठी पक्षीगृह स्टोअर रूम विद्युतीकरण खाद्य पाण्याची भांडी असा मिळून प्रकल्प खर्च 2 लाख 25 हजार रुपये आहे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान मिळते व खोल्या वर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
✳️🔰या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान; आला GR✳️
अनुदान कसे मिळवावे :
िल्हास्तरीय योजना ची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद संवर्धन अधिकाऱ्यांमार्फत होत असते काही लाभार्थी हे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून तर काही लाभार्थी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या अंतर्गत निवडले जातात या योजनेसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकार्याकडे संपर्क साधावा.