Pik vima vatap 2024 राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या पिक विमा वाटप सुरू आहे आणि अशा मध्ये जाता शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार असा प्रश्न आहे. राज्य सरकारने पिक विमा संबंधित सर्व पंचनामे करून वितरणात सुरुवात केलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती पिक विमा वाटप करणार आहे याबाबतची यादी आलेली आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे थेट पीक विमा रक्कम जमा केले जाणार आहे. सध्या राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळामध्ये 41 कोटी पिक विमा वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे
गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते असे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे . धाराशिव जिल्ह्यातील 45100 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 41.62 कोटी रुपयांचे रक्कम जमा करण्यात येणार आहे हे रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यातील मोहोळा कळंब पडोळी धाराशिव सलगरा सारगाव तुळजापूर आंधळा आणि सोनारी या नव तालुक्यामध्ये ही रक्कम दिले जाणार आहे
Pik vima vatap 2024; 2023 मधील नुकसान भरपाई वाटप :
मागील वर्षी 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा झाला होता राज्य शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा जिल्ह्यांना प्रथमतः नुकसान भरपाई देण्याचे सुरू केलेले आहे आणि अशा मध्येच धाराशिव जिल्ह्याचा यामध्ये क्रमांक लागलेला आहेनुकसान भरपाईची रक्कम दिल्याने शेतकऱ्यांना एक आधार मिळत आहे यावर्षीच्या समोर असलेल्या दुष्काळ सामोरे जाण्यासाठी हे रक्कम फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यांचा आर्थिक भर काही अंश कमी होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकास फायदा होणार आहे
⏩🌤️“राज्यात वाढते तापमान..! पुढील पाच दिवसात कसे हवामान राहणार ?☀️”⏪
इतर जिल्ह्यातील पिक विमा कधी :
राज्यात बऱ्याच ठिकाणी पिक विमा वाटप होत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप झालेले नाही या संबंधातले अनेक संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी अधिकारी व कृषी विभागाकडे याबाबतची चौकशी करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला किती अनुदान वितरित झालेले आहे आणि यामधून याचा लाभ कसा घ्यायचा आहे हे शेतकऱ्यांनी पाहायचं आहे. राज्यातील पिक विमा कंपन्या आणि सरकारमध्ये जे काही नियोजन झालेले आहे यामधून बराच गोंधळ समोर येत आहे आणि पिक विमा वाटप हे नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्याला कधी पिक विमा वाटप होणार आहे याबाबत कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे आपापल्या जिल्ह्यामधील पिक विमा वाटप बाबत सर्व चौकशी कृषी विभागाकडे करून घ्यायची आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे . ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : येथे क्लिक करा